Jump to content

टायटन (उपग्रह)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांगकाम्या (चर्चा | योगदान)द्वारा १२:५२, १० सप्टेंबर २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
टायटन

नैसर्गिक रंगामध्ये टायटन
कक्षीय गुणधर्म
अर्धदीर्घ अक्ष: १२,२१,८७० किमी
वक्रता निर्देशांक: ०.०२८८
परिभ्रमण काळ: १५.९४५ दिवस
कक्षेचा कल: ०.३४८५४°
कोणाचा उपग्रह: शनी


टायटन (रोमन: Titan ; ग्रीक: Τῑτάν) हा शनीचा सर्वांत मोठा उपग्रह असून नैसर्गिक उपग्रहांमध्ये घन वातावरण असणारा एकमेव उपग्रह आहे. १६५५ साली ख्रिस्तियान ह्युजेन्स या डच खगोलशास्त्रज्ञाने हा उपग्रह शोधला. टायटनवरील वातावरण थंड, म्हणजे उणे १७९ अंश सेंटिग्रेड तापमानाचे आहे. त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा परिवलन काळ आणि शनीभोवती फिरण्याचा परिभ्रमण काळ सारखाच, म्हणजे १६ दिवसांचा आहे. टायटनवर पाण्याऐवजी मिथेन आणि इथेनच्या रूपात द्रवरूप कर्बोदकांचे अस्तित्त्व आढळते.